You are currently viewing अणसूर पाल हायस्कूलमध्ये मराठी राज्यभाषा पंधरवडा साजरा…

अणसूर पाल हायस्कूलमध्ये मराठी राज्यभाषा पंधरवडा साजरा…

अणसूर पाल हायस्कूलमध्ये मराठी राज्यभाषा पंधरवडा साजरा…

वेंगुर्ले

शासनाच्या निकषानुसार अणसूरपाल हायस्कूलमध्ये मराठी राज्यभाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मार्गदर्शक विजय ठाकर यांनी मराठी भाषेची उत्पत्ती, थोरवी-महती , मराठी भाषेतील समृद्ध साहित्य परंपरा-लेखक, कवी, इतिहासकार, नाटककार आदींची माहिती दिली. २८ जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम साजरा होणार आहे. दरम्यान यावेळी त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांच्या नाट्यउताऱ्याचे वाचन केले. शिक्षिका चारुता परब यांनी मकर संक्रांत सणाविषयी विद्यार्थ्याना माहिती दिली.

यावेळी मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षक अक्षता पेडणेकर, सुधीर पालकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीततेसाठी शालेय मुख्यमंत्री आदर्श गावडे, विद्यार्थीनी प्रमुख पुर्वा आमडोसकर, अस्मिता गावडे, प्राची गावडे यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा