You are currently viewing वायरी येथे अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला आ.वैभव नाईक यांनी दिली भेट

वायरी येथे अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला आ.वैभव नाईक यांनी दिली भेट

बॉक्स क्रिकेट मध्येही आ.वैभव नाईक यांची फटकेबाजी

प्रिन्स बॉईझ वायरी- रेकोबा क्रिकेट क्लब व के.सी.सी. मालवण आयोजित कै.सुधीर चव्हाण स्मृतीचषक २०२२ भव्य नाईट बॉक्स अंडरआर्म (सिंधुदुर्ग प्रिमियर लीग) क्रिकेट स्पर्धेला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी  भेट दिली.याप्रसंगी आ.वैभव नाईक यांनी कै.सुधीर चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.तसेच बॉक्स क्रिकेट मध्येही आ.वैभव नाईक यांनी चांगल्या बॅटिंगचे प्रदर्शन करत फटकेबाजी केली. तर शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी बॉलिंगचे प्रदर्शन केले.

मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, प्रसाद आडवणकर,संदेश तळगावकर,नाना नाईक, तपस्वी मयेकर,जयू लुडबे आणि सुधीर चव्हाण मित्र मंडळ व प्रिन्स बॉईज क्रिकेट क्लब व के.सी.सी मालवण चे खेळाडू उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =