You are currently viewing लढा अस्तित्वाचा

लढा अस्तित्वाचा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर यांची काव्यरचना

जखडून घेऊ नको स्वतःला
चूल , मूल अन् संसारात
निर्माण कर अस्तित्व स्वतःचे
पुढारलेल्या या समाजात

गरीब अबला समजून
करतील अन्याय तुझ्यावर
फोड वाचा अन्यायाला
सोड शब्दास्त्र त्यांच्यावर

करत असतील समाजकंटक
अपमान तुझ्या स्त्रीत्वाचा
लढ झाशीची राणी बनुनी
हा लढा तुझ्या अस्तित्वाचा

रणरागिणी तू नव्या युगाची
होऊनी स्वार बुलेटवर
करुनी ये तू सैर जगाची
राहू दे पाय जमिनीवर

महिला नव्हे जगत् जननी तू
कधी मारू नको डंख
झेप घेणाऱ्या सखीचे
कधी छाटू नकोस पंख

वृद्ध सासू सासऱ्यांच्या
आधाराची काठी बन
गृहलक्ष्मी घराची बनुनी
सर्वांना दे प्रेमाचे धन

*✒️© सौ आदिती धोडी मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − 3 =