You are currently viewing मत्स्य पॕकेजसाठी मच्छीमारांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

मत्स्य पॕकेजसाठी मच्छीमारांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

मालवण

क्यार, महाचक्रीवादळामुळे पूर्ण क्षमतेने मासेमारी करू न शकलेल्या सागरी मच्छीमारांसाठी राज्य सरकारने ॲागस्ट २०२० मध्ये ६५ कोटी रुपयांचे आर्थिक पॕकेज जाहीर केले होते. या आर्थिक पॕकेजपासून वंचित राहिलेल्या रापण व्यावसायिक मच्छीमारांनी दांडी समुद्रकिनारी गुरूवारी सकाळपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्या दिवशीही सदरील उपोषण आंदोलन सुरू होते. पहिल्या दिवशी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रवींद्र मालवणकर यांनी आंदोलनकर्ते मच्छीमार कमलेश कोचरेकर यांच्याशी चर्चा केली. मात्र जोपर्यंत पॕकेजचे पैसे खात्यात जमा होत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा मच्छीमारांनी घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा