You are currently viewing भाजयुमो सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारणी बैठक ओरोस येथे जिल्हाध्यक्ष आनंद सावंत व जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली संपन्न

भाजयुमो सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारणी बैठक ओरोस येथे जिल्हाध्यक्ष आनंद सावंत व जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली संपन्न

बैठकीत मंडल प्रभारी व रिक्त पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका..

 

कुडाळ :

 

ओरोस येथे भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारणी बैठक युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद (भाई) सावंत व जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाली. या बैठकीत संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक मंडलात प्रभारी व अनेक रिक्त पदाधिकाऱ्यांच्या नेमणूक करण्यात आल्या. बैठकीस जिल्हा युवा मोर्चाचे पदाधिकारी, सर्व मंडल तालुका अध्यक्ष व जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्व जिल्ह्यातील बूथ रचना पूर्ण करणे, मन की बात कार्यक्रमाचा आढावा घेणे, धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात घेणे, नव मतदार नोंदणी करणे, जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका कार्यकारणी नव्याने करण्यात येणाऱ्या नियुक्त्या जाहीर करणे, आगामी सर्व निवडणुका ताकदीने लढणे अशा अनेक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

मंडल मजबुतीसाठी प्रत्येक मंडलाला प्रभारी म्हणून अनेक नेमणुका ह्या बैठकीत करण्यात आल्या त्या पुढीलप्रमाणे: दोडामार्ग- आनंद (भाई) सावंत, बांदा- हितेश धुरी व संजय नाईक, आंबोली-संदिप पाटील, सावंतवाडी शहर- जावेद खतीब, वेंगुर्ला- अनंत राज पाटकर , कुडाळ शहर- तुषार साळगावकर, ओरोस मंडल- आशिष हडकर, मालवण ग्रामीण व शहर- भूषण आंगचेकर, मालवण ग्रामीण (आचरा विभाग)-चेतन चव्हाण, कणकवली शहर व ग्रामीण- संदिप मेस्त्री व सर्वेश दळवी, देवगड शहर व ग्रामीण- संदिप मेस्त्री व सर्वेश दळवी, वैभववाडी – संतोष पुजारे अशा प्रभारी पदी निवडी करण्यात आल्या. यावेळी बोलताना सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी युवा मोर्चाची ताकद आणि भारतीय जनता पार्टी मुळे युवा वर्गाला भविष्यातील उपलब्ध असणाऱ्या संधी यांची जाणीव करून दिली. युवा वर्गाने प्रभाव अभाव व स्वभाव यातील फरक समजून घेऊन आपल्या स्वभावाने आपण समाजातील आपली ओळख तयार करा असे सूचित केले.

जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही वशिल्यावर पदे देणारी पार्टी नाही तर तुम्ही केलेल्या कामाच्या तुम्ही उभारलेल्या लढ्याच्या तुम्ही तयार केलेल्या स्वतःच्या प्रतिमेच्या लेख्याजोखाने पदे देणारा पक्ष आहे. भविष्यात मोठी संधी राजकारणात काम करताना युवा पिढीला आहे त्यामुळे आतापासूनच पक्षासाठी जोरदार काम करा. आगामी जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये युवा मोर्चाच्या पदाधिकारी यांना ताकद देण्याची जबाबदारी माझी आहे असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.

युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांनी येत्या २५ नोव्हेंबरला विस्तृत जिल्हा कार्यकारणीची महत्वाची बैठक पार पाडली जाणार असल्याने सर्व दिलेल्या जबाबदाऱ्या प्रभारी व तालुका अध्यक्ष यांनी दिलेल्या मुदतीत पूर्ण कराव्यात अशा सूचना दिल्या.

या बैठकीस संघटन सरचिटणीस संदिप मेस्त्री, जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, मतदार नोंदणी मोहीम जिल्हा संयोजक हितेश धुरी, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष मंदार पडवळ तसेच सर्व मंडल अध्यक्ष जिल्हा कार्यकारणी सदस्य तालुका कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार श्रीपाद उर्फ पप्या तवटे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 20 =