कणकवली
कणकवली तालुक्यातील पत्रकारांसाठी पंचायत समितीच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या कक्षामध्ये येत्या काळात वाचनालयासह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तालुक्यातील पत्रकारांच्या माध्यमातून यापुढेही तालुक्याच्या विकासासाठी वेळोवेळी मार्गदर्शन सुरूच राहू दे असे प्रतिपादन कणकवली सभापती मनोज रावराणे यांनी केले. कणकवली पंचायत समितीच्या नवीन इमारती मधील पत्रकार कक्षाच्या शुभारंभप्रसंगी श्री रावराणे बोलत होते. या पत्रकार कक्षाचे लोकार्पण जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठें यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती मिलिंद मेस्त्री, प्रकाश पारकर, गणेश तांबे, भाग्यलक्ष्मी साटम, हर्षदा वाळके, मंगेश सावंत, दिलीप तळेकर, राधिका सावंत, स्मिता मालडीकर, मंगेश सावंत, तृप्ती माळवदे, सुजाता हळदीवे, बीडीओ अरुण चव्हाण, सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर व तालुका पत्रकार संघाचे सर्व पत्रकार उपस्थित होते.