You are currently viewing मनसे कुडाळ प्रभारी तालुकाध्यक्षपदी सखाराम उर्फ सचिन सावंत यांची नेमणूक

मनसे कुडाळ प्रभारी तालुकाध्यक्षपदी सखाराम उर्फ सचिन सावंत यांची नेमणूक

कुडाळ तालुक्याची बैठक जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाज हॉल येथे पार पडली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली ,आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका, संघटना बांधणी, रिक्त पदांची नियुक्ती असे विषय होते …
बैठकीमध्ये मागील सर्व घटना व चर्चेअंती प्रसाद गावडे यांच्याकडील तालुकाध्यक्ष पदाचे सर्व अधिकार गोठविण्याचे एक मताने ठरवण्यात आले , मागील काही वर्षे गावडे हे
पक्षशिस्त न पाळणे ,पक्ष आदेश न पाळणे व इतर लोकांच्या तक्रारी अशा 15 मुद्दे/ कारणे अहवाल वरिष्ठ नेते मंडळींकडे पाठवण्यात आला आहे


., त्यावर लेखी अहवाल उत्तर देण्याची विनंती देखील जिल्हाध्यक्ष यांनी वरिष्ठांकडे केली आहे .संबंधित तक्रारींचे 15 मुद्दे /कारणे यांचा अहवाल उत्तर वरिष्ठाकडुन लेखी स्वरुपात येई पर्यंत प्रभारी तालुकाध्यक्ष यांच्याकडे कुडाळ तालुकाध्यक्ष पदभार सोपविण्यात आला आहे..
या पुढे गावडे यांनी पुढील सुचना येई पर्यंत तालुका अध्यक्ष म्हणून लेटरहेड वापरणे, पक्ष बैठका घेणे, पत्रकार परिषद/ पत्रक/ पत्रव्यवहार करणे या गोष्टी करु नये अशा सुचना गावडे यांना कारवाई म्हणून दिलेल्या पत्रात आहेत..
प्रभारी तालुकाध्यक्ष सखाराम उर्फ सचिन सावंत हे मागील एक वर्षापासून मनसे पक्षांमध्ये सक्रीय कार्यरत आहेत. त्यांच्याकडे उपतालुका अध्यक्षपद होते, वयाच्या पंधराव्या वर्षापासून पुर्वी त्यांनी शिवसेनेचे काम केले आहे. सेनेच्या पडत्या काळात माणगाव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी मोलाचे आणि आणि भरीव काम केले ,पक्षबांधणी ,संघटन कौशल्य ,सामाजिक उपक्रम, यामुळे दश क्रोशीमध्ये त्यांनी आपली चांगली ओळख निर्माण केली आहे, यापूर्वी ते माणगाव शिवसेना शहर अध्यक्ष पदी काम करत होते, सामान्य लोकांच्या दैनंदिन समस्या बाबत विद्युत विभाग ,महसूल विभाग, वनविभाग ,सहकार क्षेत्रात त्यांनी लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे….सेनेने डावलल्याने त्यांनी मनसे सरचिटणीस जी जी उपरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेची कास धरली , अल्पावधीत त्यांनी माणगाव खोऱ्यात मनसेच्या अनेक शाखा स्थापन केल्या. आज बैठकीत प्रमुख उपस्थितीती धीरज परब जिल्हाध्यक्ष, एसटी कामगार संघटना राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, उपतालुकाध्य जगन्नाथ गावडे, उपतालुकाध्य सचिन सावंत,ग्रामपंचायत सदस्य सुशांत परब, विनित परब – केरवडे शाखाध्यक्ष, अभिषेक घाडी -शाखाध्यक्ष नानेली,प्रताप भोई- विद्यार्थी सेना शाखाध्यक्ष, असे पदाधिकारी उपस्थित होते. तर बैठकीला मोठ्या संख्येने महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते….. नव नियुक्ती म्हणून सुरज घाटकर विभाग अध्यक्ष ,साळगाव, रत्नकांत शेडगे शाखाध्यक्ष उपवडे ,वसोली, संदेश कर्पे शाखाध्यक्ष साळगाव यांची नेमणूक करण्यात आली व पत्र देण्यात आली…
पदभार स्वीकारताना भरीव व चांगली कामगिरी करेन व सर्वाना सोबत घेवुन पक्ष वाढवेन असे सचिन सावंत यांनी सांगितले आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा