You are currently viewing सावंतवाडीत चारचाकीची दुचाकीला धडक; उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू…

सावंतवाडीत चारचाकीची दुचाकीला धडक; उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू…

सावंतवाडी

चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात कणकवलीतील दोघे युवक गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास येथील जयप्रकाश चौकात घडला. साईल भगत (२२) व रोहन तांबे (२३), अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित जखमी दोघेही युवक एका खाजगी औषध वितरण कंपनीत डिस्ट्रीब्यूटर आहेत. ते या ठिकाणी कामानिमित्त आले होते. दरम्यान आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन जात असताना येथील जयप्रकाश चौकात भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी कारची त्यांना जोरदार धडक बसली. यात दोघेही जखमी झाले. तर दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 1 =