You are currently viewing प्राध्यापक अनिल गोवेकर यांना “मराठी भाषा गौरव पुरस्कार” जाहीर !! 

प्राध्यापक अनिल गोवेकर यांना “मराठी भाषा गौरव पुरस्कार” जाहीर !! 

सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या पुरस्कारांची घोषणा..

सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाचा यावर्षीचा जिल्हास्तरीय मराठी भाषा गौरव पुरस्कार कुडाळ मांडकुली-केरवडे येथील आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अनिल गोवेकर यांना जाहीर झाला. यावेळी जिल्ह्यातील तालुकास्तरीय आठ पुरस्कारही जाहीर करण्यात आले. अध्यापक संघाच्या जिल्हा बैठकीत कार्याध्यक्ष भरत गावडे यांनी हे पुरस्कार जाहीर केले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी अध्यापकांना दरवर्षी “मराठी भाषा गौरव पुरस्कार” दिले जातात. अनिल गोवेकर हे गेली पंचवीस वर्षे कुडाळ येथील आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडे या विद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करतात. त्यांनी मराठी भाषा समृद्धी साठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.

पुरस्कार निवड समितीत भरत गावडे, पांडुरंग सामंत, अजय सावंत, रोहिणी मसुरकर, भीमराव येडगे यांचा समावेश होता. स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सन 2021 व 2022 चे पुरस्कार एकाच वेळी लवकरच वितरित करण्यात येणार आहेत !!

प्रतिक्रिया व्यक्त करा