You are currently viewing नेरुर चव्हाटा मित्रमंडळ आयोजित दशावतारी नाट्यप्रयोग उद्घाटन सोहळा संपन्न

नेरुर चव्हाटा मित्रमंडळ आयोजित दशावतारी नाट्यप्रयोग उद्घाटन सोहळा संपन्न

 

नेरुर चव्हाटा मित्रमंडळ आयोजित दशावतारी नाट्यप्रयोगाचा उद्घाटन सोहळा सन्माननिय रुपेश पावसकर शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच यावेळी गोवा राज्य कला व सांस्कृतिक संचनालयाचा एकता पुरस्कार मिळाल्याबद्दल चेंदवणकर दशावतार मंडळाचे मालक श्री देवेंद्र नाईक यांचा सत्कार प्रमुख अतिथी श्री रुपेश पावसकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी रंगमंचावर दत्ता देसाई, देवेंद्र नाईक, पोलिस पाटील गणपत मेस्त्री, सुधाकर नेरुरकर, प्रकाश साऊळ, गोसावी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ पाटकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रवीण नेरुरकर, बाबी साऊळ, सुधीर नेरुरकर, सागर नारींग्रेकर, अजय कदम, उमेश परब हे मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नंतर अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचा कूर्मदासाची वारी हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा