You are currently viewing पदर प्रतिष्‍ठानच्या वुमन्स वेल बिईंग आरोग्‍य शिबिराला महिलांचा प्रतिसाद

पदर प्रतिष्‍ठानच्या वुमन्स वेल बिईंग आरोग्‍य शिबिराला महिलांचा प्रतिसाद

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती;.माधुरी म्‍हसकर यांच्याहस्ते उद्‌घाटन

कणकवली

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पदर प्रतिष्‍ठान कणकवली आणि एसएसपीएम लाईफ टाईम हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहात आज आरोग्‍य शिबिराचा प्रारंभ झाला. डॉ.माधुरी म्‍हसकर यांनी शिबिराचे उद्‌घाटन केले. यावेळी पदर प्रतिष्‍ठानचे संस्थापक आणि नगराध्यक्ष समीर नलावडे, प्रतिष्‍ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण, आदी उपस्थित होते. महिला दिनाचे औचित्य साधत पदर प्रतिष्‍ठानच्या वुमन्स वेल बिईंग या आरोग्‍य शिबिरात कणकवली शहर आणि परिसरातील महिलांची आरोग्‍य तपासणी केली जाणार आहे. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास मोफत शस्त्रक्रिया देखील केल्‍या जाणार आहेत.

या शिबिराच्या उद्‌घाटन कार्यक्रमावेळी पदर प्रतिष्‍ठानच्या उपाध्यक्षा हर्षदा गवाणकर, सचिव मीरा कवडे, खजिनदार सुप्रिया नलावडे, सदस्या दिशा अंधारी, साक्षी वाळके, प्रियाली कोदे, अंकिता कर्पे, दीक्षा राणे, सल्लागार कविता राणे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, वर्षा बांदेकर, संजना सदडेकर, प्राची कर्पे, राजश्री धुमाळे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, अण्णा कोदे, किशोर राणे, महेश सावंत आदी उपस्थित होते. या शिबिराला नगरपंचायत विरोधी पक्षगटनेते तथा जिल्‍हा बँक संचालक सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर तसेच जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण यांनी भेट दिली.त्याचे स्वागत प्रतिष्‍ठानच्यावतीने करण्यात आले.

या शिबिराला शहरातील महिलांचा उस्फूर्त सहभाग लाभला आहे. तसेच महिलांच्या आरोग्य विषयक तपासण्या एसएसपीएम मेडिकल कॉलेजचे डॉ.गोपाळ चिघळे, डॉ.कैलास मेरट, डॉ.गायत्री पालयेकर, डॉ सुधीर गोसावी तसेच वैद्यकीय सामजिक कार्यकर्ते अरविंद कुडतरकर आदींच्या माध्यमातून केल्‍या जात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 5 =