सावंतवाडी
महिला दिनाचे औचित्य साधून कुणकेरी गावात उद्या मंगळवारी सकाळी 10 ते 02 या वेळेत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुणकेरी येथे सर्वांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये हिमोग्लोबिन तपासणी, महिला व पुरुषांसाठी विविध तपासण्या करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.