You are currently viewing आ.वैभव नाईक यांच्या वेंगुर्ले दौऱ्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

आ.वैभव नाईक यांच्या वेंगुर्ले दौऱ्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

वेंगुर्ला

कुडाळ मालवण बरोबरच सावंतवाडी तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी वेंगुर्ले तालुक्याचा दौरा केला.यावेळी वेंगुर्लेमधील अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी उपस्थित राहून आपले विविध प्रश्न समस्या मांडल्या. आ.वैभव नाईक यांनी तहसीलदार, पोलिस निरीक्षक, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन तात्काळ ते प्रश्न समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, तालुकाप्रमुख सभापती बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, उपसभापती सिद्धेश परब, म्हाडा सदस्य सचिन वालावलकर, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, माजी सभापती सुनील मोरजकर, महिला शहरप्रमुख मंजुषा आरोलकर, सौ. राऊळ, नीलेश चमणकर, शशिकांत परब, संजय परब, कार्मिस अल्मेडा, अभिमन्यू धुते, काशिनाथ नार्वेकर, अशोक नाईक, देवदास कांबळी, प्रशांत शिरोडकर आदीसह नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − twelve =