You are currently viewing मालवणातील तरुणाई मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित….

मालवणातील तरुणाई मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित….

असंख्य तरुणांचा मनसेत जाहीर प्रवेश….

मालवण :

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरीत होऊन तसेच मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील तारकर्ली येथील माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या खंदे समर्थकांनी व शहरातील भरड नाका तसेच शहरातील इतर ठिकाणच्या असंख्य तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, माजी मनविसे जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, उप जिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मालवण सचिव विल्सन गिरकर, गिरीश उपरकर आदी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =