*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ यांची अप्रतिम काव्यरचना*
*जातीचे रंग*
***************
आम्ही आमच्या जातीला
रंग लावायला लागलो
माणसा माणसात भेद
करायला लागलो
नाते आपुलकीचे होते
एकेकाळी समांतर
जाती जातीत आता
अंतर बघायला लगलो
वेग वेगळ्या जातीचे
झालेत किती रंग
त्या रंगाची जात घेवून फिरायला लागलो
सोडून आपल्या माणसाचा हात
दुर पळायला लगलो
कुठूनतरी येतो
द्वेषाचा आवाज
लागते आग जातीला
आपलेच आपल्यापासून
तोडायला लगलो
जातीचे राजकारण करून
माणुसकी सोडायला लगलो
उभे केलेत चौका चौकात
पुतळे
कोणती जात त्यांचा आदर्श घेते
अरे देश त्यांनी घडवला
आणि आम्ही फोडायला
लागलो.
जात वेगळी करणाऱ्यांना
हात जोडायला लगलो
कुठे गेली एकतेची ताकद
आम्ही सारे भाई भाई च्या घोषणा
देशाला एकात्मतेची गरज असताना
एकमेकांशी आपसात लढायला लगलो
माणसा माणसात
जातीचे रंग उधळायला लागलो
माणुसकी हिच खरी जात आहे
सत्यमेव जयतेच्या बळावर
देश उभा आहे
जात विसरून साथ दिली
तर जोडले जाईल
एक नाते एक संघ
नाहीतर….
लागत राहील पिढ्यान पिढ्या
जातीला रंग
*संजय धनगव्हाळ*
धुळे
९४२२८९२६१८