You are currently viewing मळगाव केंद्रात शिष्यवृत्ती सराव परीक्षा सुरळीत

मळगाव केंद्रात शिष्यवृत्ती सराव परीक्षा सुरळीत

बांदा/सिंधुदुर्ग

दि.३ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षा मळगाव केंद्रात केंद्रप्रमुख शिवाजी गावीत सर यांच्या नियोजनात संपन्न झाली.
या परीक्षेचे उद्‌घाटन माजी सरपंच प्रमोद गावडे ,केंद्रप्रमुख शिवाजी गावित यांनी केले. प्राथ . शिक्षक समितीच्या या उपक्रमाचे कौतुक करुन विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका नीलम कानसे,सागर खटावकर, अमोल सावंत शिक्षक समिती जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक सर व इतर शिक्षक बंधु भगिनी उपस्थित होत्या .मळगाव केंद्रात संघटनेच्या या उपक्रमासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल जिल्हा कार्याध्यक्ष नारायण नाईक यांनी सर्वांचे आभार मानले .
शिक्षक समितीने जिल्हयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षेसारखे विविध नाविण्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवित असलेबाबत पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 4 =