You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयात मेकअप, हेअर स्टाईल, नेल आर्ट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात मेकअप, हेअर स्टाईल, नेल आर्ट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी

येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या मेकअप, हेअर स्टाईल व नेल आर्ट स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते झाले.
यावेळी नियामक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल, प्रा .डॉ बी एन हिरामणी, कला सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा डॉ डी जी बोर्डे उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोसले यांनी मुलांच्या उत्साहा बद्दल कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेची संकल्पना प्रा.स्नेहा तारी (कॉमर्स विभाग ), प्रा. एस.जे.जाधव यांची होती. त्यांनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेचे सूत्रसंचालन कला सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा. डॉ.डी.जी.बोर्डे यांनी केले .तर सह समन्वयक डॉ. एस. एम. बुवा यांनी आभार मानले. यावेळी कला व सांस्कृतिक विभागातील सदस्य प्रा. एस. ए. देशमुख, प्रा.डॉ. वाय.ए. पवार यांचे सहकार्य लाभले.तर परीक्षणाचे कार्य सौ.स्नेहल धुरी यांनी केले.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
मेकअप स्पर्धा
१ )कु. रुक्सार मुश्ताक मेनन- प्रथम क्रमांक
२) आलिया आय. राजगुरू- द्वितीय क्रमांक
३) तेजा वाय. भानसे -तृतीय क्रमांक
हेअर स्टाईल स्पर्धा
१)रुक्सार मुश्ताक मेनन- प्रथम क्रमांक
२)मालिनी मदन आमरे- द्वितीय क्रमांक
३) तेजा वाय. भानसे तृतीय क्रमांक
नेल आर्ट
१)देवांशी नारायण लोहार- प्रथम क्रमांक
२) नीलम राजन पवार – द्वितीय क्रमांक यावेळी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा