You are currently viewing माय मराठी

माय मराठी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर यांची मराठी भाषेची महती सांगणारी काव्यरचना

माझी माय मराठी
महाराष्ट्राची जननी
किती करु गुणगान
आज तिचे मनोमनी

देवनागरी लिपीत
भासे मोत्यांचे दाणे
स्वरालंकारात उठती
तिचे मंजुळ तराणे

शब्दा शब्दात गुंफून
गद्य पंक्तीत शोभते
रसिक वाचकांच्या
मनावर तीच बरसते

ओव्या पोवाड्या मधून
किती गोडवे तिचे गावे
आतुरताच कान माझे
मन तिच्या ओढीने धावे

*✍️ ©सौ. आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा