You are currently viewing कोकणच्या विकासासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी खात्याचा उपयोग करणार

कोकणच्या विकासासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी खात्याचा उपयोग करणार

–  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कुडाळ येथे प्रतिपादन

कुडाळ

कोकणच्या विकासासाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी माझ्याजवळ असलेल्या खात्याचा उपयोग करणार आहे असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील कॉनबॅकच्या स्फुर्ती योजने अंतर्गत उभारलेल्या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

कुडाळ एमआयडीसी येथे कोनबॅकच्या योजनेअंतर्गत उभारलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले यावेळी माजी आमदार पाशा पटेल, सौ निलमताई राणे, सूक्ष्म, लघु तथा मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव बी. बी. स्वॅईन, खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, राष्ट्रीय कॉयर बोर्डाचे अध्यक्ष कुप्पूरमू, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, कॉनबॅकचे कार्यकारी संचालक मोहन होडावडेकर संजय कर्पे आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले की आपल्या कोकणातील तरुण उद्योजक बनावे त्यांच्यामध्ये उद्योग करण्याची इच्छा निर्माण व्हावी आणि आर्थिक प्रगती करावी यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प आणले जात आहेत तसेच प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत कोकणातील व्यक्ती गरीब राहू नये ही आमची इच्छा आहे. कोकणचा विकास आणि आर्थिक प्रगती ही उद्योगातून व्हावी म्हणून माझ्या खात्याचा जेवढा फायदा कोकणातील उद्योजकांना करून देता येईल तेवढा मी देणार आहे काही जण चेष्टा करत आहेत पण त्यांनी उद्योगासाठी काय प्रयत्न केले ते सांगावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी सांगितले की आपण काजू आणि आंबा याकडे उत्पन्न देणारी झाडे म्हणून पाहतो पण बांबूची लागवड सुद्धा मोठे उत्पन्न देऊ शकते त्यामुळे बांबूची लागवड सुद्धा झाली पाहिजे आणि त्यातून आर्थिक उन्नती साधली गेली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा