You are currently viewing …. “तरुणांनो, उद्योजक व्हा!रोजगार निर्माण करा. उत्पन्नात भर टाका. स्वतःचे, देशाचे उत्पन्न वाढवून आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी प्रयत्न करूया…!

…. “तरुणांनो, उद्योजक व्हा!रोजगार निर्माण करा. उत्पन्नात भर टाका. स्वतःचे, देशाचे उत्पन्न वाढवून आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी प्रयत्न करूया…!

ना. नारायणराव राणे यांनी पत्राद्वारे साधला सिंधुदुर्गातील जनतेशी मुक्तसंवाद

कोकणातील सर्व वडीलधारी मंडळी व तरुण मित्र हो….!

आज मी तुमच्याशी या पत्राद्वारे राजकारण सोडून बोलण्याचे ठरवले आहे. मला भारतीय जनता पक्षाचे नेते मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, मा. गृहमंत्री अमितजी शहा, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग हा विभाग मला दिला आहे. या निर्णयाचा आनंद कोकणातील लोकांना किती झाला यावर मी भाष्य करणार नाही. मला आनंद झाला तो यासाठी की कोकणातील आपल्या माणसांची उद्योग रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करण्याची ही मला संधी मिळाली आणि त्यामुळे या विभागातर्फे मी कोकणातील तरुणांना, उद्योजकांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे, प्रेरणा मिळावी, उद्योग उभारायला आर्थिक मदत मिळावी, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजींची त्यांना ओळख व्हावी आणि त्यातून वेगवेगळी उत्पादने काढून आर्थिक प्रगती साध्य करता यावी यासाठी सर्वतोपरी प्रबोधन आमच्या विभागातर्फे घेण्याचे ठरविले आहे. यासाठी कोकणातील सर्व जिल्ह्यात ट्रेनिंग सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. अशा सेंटर मधून वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन करणारी वेगवेगळी कार्यालय खुले होतील. या माध्यमातून उद्योग करू इच्छिणाऱ्या बेरोजगारांना रोजगार मिळेल. मोठ्या प्रमाणात महिलांच्या हातांना काम मिळवून त्या कुटुंबांला हातभार लावू शकतील. थोडक्यात महिलांचे सबलीकरण यातून होईल, या उद्देशाने मी प्रयत्न करीत आहे. फेब्रुवारी २५, २६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध योजनांची ओळख, विविध मशिनरीजची ओळख, उद्योग किंवा व्यवसाय करण्याचे स्कील (कौशल्य) यांच्या मार्गदर्शनातून असंख्य उद्योग जिल्ह्यात सुरू व्हावेत. जिल्ह्यातील साधनसामग्रीच्या सहाय्याने उत्पादने काढणारे उद्योग तयार व्हावेत हा प्रयत्न आहे. २५ तारीख ला या मशिनरीज पहावयास ठेवण्यात आलेल्या आहेत.

सिंधुदुर्गातील तरुणांनो, उद्योजकांना, आता तुम्हाला हताश व्हायची गरज नाही. आर्थिक चिंतेत राहायची गरज नाही. ज्या उद्योजकांना काही करून दाखवायचे आहे, ज्या नवउद्योजकांना संधी हवी आहे, त्यांच्याकडे तर एकच पर्याय आहे …MSME हा केंद्र सरकारचा विभाग !!

सूक्ष्म विभागातील उद्योगांसाठी एक कोटीची मर्यादा आहे, लघु विभागातील उद्योगांमध्ये ५० कोटींची मर्यादा आहे. मध्यम विभागातील उद्योगांसाठी २५० कोटींची मर्यादा आहे आणि त्यावर सबसिडी ही मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा सर्वांना सांगायचे आहे, हा राजकारणाचा भाग नाही. तुमच्या आर्थिक प्रगतीचा हा एक भाग आहे. तेव्हा २५ व २६ ला होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. ज्या उद्योगात तुम्हाला रस आहे, आवड आहे, शिक्षण आहे, त्याबद्दलची माहिती आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उपलब्ध करून घ्यावी, यासाठी हा कार्यक्रम आहे. शरद कृषी भवन ओरोस आणि कणकवली येथील प्रहार भवन मधील कॉयर बोर्डच्या कार्यालयाला भेट द्या. उद्योगासाठीचे ज्ञान आत्मसात करा. स्वाभिमानाने तुमच्या पायावर सक्षमपणे उभे राहा. या स्तुत्य हेतूने मला मिळालेल्या खात्याचा लाभ तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा उपक्रम आहे.

धन्यवाद!!

*–नारायण राणे*
*केंद्रीय मंत्री भारत सरकार*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 3 =