You are currently viewing या सूडाच्या राजकारणाचा शेवट मीच करणार…

या सूडाच्या राजकारणाचा शेवट मीच करणार…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा इशारा

कणकवली

सुडाच राजकारण यांनी सुरू केले असले तरी शेवट मीच करणार.मी पुरा ९६ आहे. माझा बंगला तोडायची कोणाची हिम्मत नाही.सर्व अटींची पूर्तता करून मालवण चा निलरत्न बंगला बांधला.त्यात काहीही अनधिकृत काही नाही. अधिकृत असल्यामुळेच आम्हाला त्यावेळी भोगवटदार पत्र मिळाले.दुसरी गोष्ट मालवणच्या बंगल्याला कोणतीही नोटीस नाही.मुंबई आणि मालवण येथे कसलेही अनधिकृत बांधकाम नाही. मात्र खोट्या बातम्या देऊन नाहक बदनामी केली जात आहे.अशी बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस दिली जाणार असल्याचे यावेळी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

कोणतीही बातमी दुसऱ्याच्या दुःखात भर टाकण्यासाठी असू नये.कोकण आणि मालवणी लोक तक्रारींचे समर्थन करायला असतात मात्र चांगले काम केले तर अभिनंदन करायला कोण आले नाही. मंत्री नवाब मलिक यांच्या बद्दल बोलतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले,हे होणारच होत, मलिक यांचे आजचे संबध नाही.अनेक वर्षांचे संबंध आहेत आता डी, आणि ए की आणखी काही गॅंग शी संबध आहेत ते उघड होतील. अजून अनेकांचे नंबर लागतील.हळूहळू सर्व कळेल.नवाब मालिकांचे अनुकरण कोणी करू नये.आता बोल म्हणावे ईडी समोर नाहीतर तोंडात विडी देणार हे ईडी वाले अशी मिस्कील टीकाही यावेळी नारायण राणे यांनी केली.

खासदार संजय राऊत बेजबाबदार बोलणार आणि आम्ही त्याला उत्तर का द्यावीत. त्याची मानसिक स्थिती चांगली नाही. दिशा सलीयन संदर्भात बोलतांना नारायण राणे म्हणाले, दिशाला ज्याने मारले त्यांना शिक्षा व्हावी म्हणून आम्ही बोलतोय. दिशा सालीयन च्या नातेवाईकांची या पूर्वी काय भूमिका होती हे सुद्धा आम्हला माहीत आहे.त्यामुळे योग्य न्यायासाठी आम्ही बोलत आहोत.असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =