You are currently viewing पियाळी येथील नदीत गढूळ पाणी आल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे नदीपात्रात आंदोलन

पियाळी येथील नदीत गढूळ पाणी आल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे नदीपात्रात आंदोलन

कणकवली

कणकवली तालुक्यातील असलदे पियाळी नदीमध्ये बरेच दिवस गढूळ पाणी होत आहे.याबाबत असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी कित्येक वेळा तक्रारी केल्या आहेत मायनिंग व्यावसायिक सदर गढुळ पाणी नदीत सोडत असल्याचे त्यांनी सांगितले आहे याबाबत सकाळपासून नांदगाव पंचक्रोशीतील सरपंच व नागरीकांच्या वतीने नदीपात्रात आंदोलन सुरू केले होते.

यावेळी आंदोलकांशी वाळु व्यावसायिक यांनी येत चर्चा केली परंतु या चर्चेत समाधान न झाल्याने चार दिवस नागरिकांना पाणी सोडणार नसल्याची भूमिका नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी घेतली आहे. कासार्डे परिसरातून सिलिका मायनिंग धारकांकडून बेसुमार वाळू मिश्रीत दूषित पाणी पियाळी नदी पात्रात सोडले जात आहे.अनेकदा नांदगाव पंचक्रोशीतील सरपंचांनी सूचना देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे नांदगाव, असलदे पंचक्रोशीतील सरपंच ,ग्रामस्थांनी नदी पात्रात उतरुन आंदोलन केले .त्यानंतर सिलिका मायनिंग व्यावसायिकांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली आहे.

या संदर्भात असलदे -नांदगाव ग्रामपंचायत सरपंच वारवार तहसीलदार , प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करुन सुध्दा प्रशासन दुर्लक्ष करत आहे,असा आरोप सरपंच पंढरी वायंगणकर यांनी केला. या आंदोलनात पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, असलदे सरपंच पंढरी वायगणकार, नांदगांव सरपंच आफ्रोजा नावलेकर,कोळोशी सरपंच श्रीमती सावंत, आयनल सरपंच बापू फाटक,कोळोशी उपसरपंच श्री. पेडणेकर, श्री.इंदप, सौ. साळसकर, संतोष परब ,नीरज मोरये, भाई मोरजकर, मज्जीद बटवाले,गवस साटवीलकर, दिनकर दळवी,सुनीता साळुंखे, कमलेश पाटील,परशुराम परब ,सतीश पोकळे,सुशील इंदप, रघूनाथ लोके,,सुरज बटवाले,सरफराज बटवाले,श्री.कोरगावकर, वैभव वायगणकर, श्रीराम मोरजकर, श्रीकृष्ण वायगणकर, मनोहर खोत, नांदगाव कोळोशी ,आयनल ,असलदे गावातील ग्रामस्थ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. याबाबत आम प्रसाद लाड यांनी अधिवेशनात तारांकीत प्रश्न मांडला होता.त्या अनुषंगाने सदर नदीचे पाणी गढूळ होत असल्याने याबाबत चौकशी करून तसा अहवाल सादर करण्यात यावा असा लेखी आदेश सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाणी व स्वच्छता पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा