You are currently viewing गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशाल परब यांनी घेतली भेट

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशाल परब यांनी घेतली भेट

*निलेश राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला उपस्थित राहण्याचे प्रमोद सावंत यांनी दिला आश्वासन*

गोवा :

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी आज भेट घेऊन कुडाळ येथे होणाऱ्या भव्य नाट्यप्रयोगाचे निमंत्रण प्रमोद सावंत यांना दिले. तर प्रमोद सावंत यांनी या नाट्यप्रयोगास आणि निलेश राणे यांच्या भव्य वाढदिवस समारंभास उपस्थित राहण्याच्या आश्वासन यावेळी विशाल परब यांना दिले आहे. विशाल सेवा फाउंडेशन च्या वतीने 17 मार्च रोजी कुडाळ येथील एसटी स्टँड नजीक मुंबई-गोवा हायवे च्या बाजूला भव्य शिवगर्जना या नाटकाचा नाट्यप्रयोग होणार आहे. कोकणातला हा एवढा मोठा भव्य नाट्य प्रयोग प्रथमच होत आहे. या नाट्यप्रयोगात 700 हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. तर हत्ती, घोडे, उंट असा लावाजमा असणार आहे. या नाट्यप्रयोगात शिवाजी महाराजांचे अनेक प्रसंग दाखवले जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण कोकण व त्यांचे लक्ष या प्रयोगाकडे आहे. यावेळी भाजपाचे नेते निलेश राणे यांचा वाढदिवसही होणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्र गोव्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. आज भाजपाचे युवा नेते आणि विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि प्रमोद सावंत यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. प्रमोद सावंत यांनी स्वतः आपण या नाट्यप्रयोगास आणि भव्य अशा वाढदिवस सोहळ्याला उपस्थित राहण्याचा आश्वासन विशाल परब यांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − six =