रविवार दिनांक २० फेब्रुवारी २०२२ रोजी “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” च्या सावंतवाडी कार्यकारणीची सभा संपन्न झाली, या सभेमध्ये संमत झालेल्या ठरावानूसार पुढील एक वर्षासाठी कार्यकारणीची पुनर्रचना करण्यात येऊन अध्यक्षपदी श्री. सुनिल राऊळ यांची एकमताने निवड करण्यात आली, तर सचिवपदी श्री. बाबली गवंडे यांची फेरनिवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातली रक्तदान, अवयवदान, देहदान व रुग्णमित्र म्हणून करत असलेल्या कार्यात अग्रगण्य असणार्या “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” च्या सावंतवाडी शाखेची जिल्हाअध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली, यावेळी वार्षिक कार्याचा आढावा घेण्यात आला, नविन कार्यक्रमांचा कृती आराखडा तयार करण्यात आला, विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुन मार्गदर्शन व काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
संस्थेच्या घटनेला व जिल्हा कार्यकारणीच्या सभेतील ठरावांस अनुसरुन सावंतवाडी तालुका कार्यकारणीची फेररचना करण्यात आली, नवीन कार्यकारणी करताना काही अंशतः बदल करण्यात आले.
सभेमध्ये अध्यक्ष पदी श्री सुनिल राऊळ यांची एकमताने निवड करण्यात आली, उपाध्यक्षपदी दीपक तारी व श्रीम. मंगल कामत यांची तर सचिव पदी बाबली गवंडे यांची फेरनिवड करण्यात आली.
सावंतवाडी दोडामार्ग तालुका विभागीय अध्यक्ष म्हणून श्री.संजय पिळणकर यांची निवड करण्यात आली. तालुका कार्यकारणीत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले.
नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे-
(अध्यक्ष) सुनिल राऊळ
(उपाध्यक्ष) दीपक तारी व
मंगल कामत
(सचिव) बाबली गवंडे
(सहसचिव) अनिकेत सावंत
(खजिनदार) सिद्धार्थ पराडकर
(सहखजिनदार) सुप्रिया मोडक
सदस्य संदीप चांदेकर
राकेश परब
निलेश मोरजकर
विद्याधर नाईक
हेमंत मराठे
तानाजी खोत
सौरभ पडते
रविंद्र तावडे
काका भिसे
जयगणेश गावकर
याचबरोबर यावेळी संस्थेच्या जिल्हा सल्लागारपदी सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक श्री. दयानंदजी गवस यांची तर तालुका कार्यकारणी सल्लागारपदी श्री. सुधीरजी पराडकर व श्री. आनंदजी वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली, आणि त्याबद्दल या तिघांच्याही अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला, तर तालुका सचिव म्हणून चांगल्या पद्धतीने जबाबदारी सांभाळल्याबद्दल श्री. बाबली गवंडे यांच्याही अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
जिल्हा सल्लागार श्री.दयानंदजी गवस यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व मार्गदर्शन व महत्त्वाच्या सूचना केल्या, नूतन तालुका अध्यक्ष श्री.सुनिलजी राऊळ यांनी मनोगत व्यक्त केले, तर जिल्हाअध्यक्ष श्री. प्रकाशजी तेंडोलकर तसेच जिल्हासचिव श्री. किशोरजी नाचणोलकर यांनी सर्वांचे अभिनंदन करुन सदिच्छा दिल्या, सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. शेवटी सचिव श्री. बाबली गवंडे यांनी आभार मानले आणि अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.