You are currently viewing ठुशी

ठुशी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.रेखा कुलकर्णी यांची अष्टाक्षरी अलंकार काव्यमाला

राजेशाही हा दागिना,
महाराष्ट्र प्रांतामध्ये.
मुली असो वा ललना,
घालतात गळ्यामध्ये.

गुंफूनिया सोनतारी,
मनी जोंधळे सोन्याचे,
लाल माणिक पाचूचे,
शोभे पदक ठुशीचे.

शालू पैठणी नेसता,
केला नेटका शृंगार.
ठुशी वाचून ना शोभा,
जरी घातला मी हार.

साज कोल्हापुरी खास,
ठुशी गळ्याशी दाटते.
रुप पाहता दर्पणी,
मनोमनी मी लाजते.

दिवाळीची आठवण,
गळामिठी मला देते.
घरधन्याने दिलेली,
ठुशी गळ्यात सजते.

रेखा कुलकर्णी ©®
चिंचवड, पुणे
सर्व हक्क स्वाधीन
१६/९/२०

प्रतिक्रिया व्यक्त करा