You are currently viewing अण्णा कावतील मंडळाच्या वतीने शिलेदारांचा सत्कार

अण्णा कावतील मंडळाच्या वतीने शिलेदारांचा सत्कार

 

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजीत शहरातील गावभाग येथील अण्णा कावतील मंडळाच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधत देशासाठी सेवा देणारे , निरपेक्ष सामाजिक कार्य करणारे व प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत समाजासमोर आदर्श ठेवणा-या शिलेदारांचा सत्कार कार्यक्रम मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते पार पडला.यावेळी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

इचलकरंजी शहरातील गावभाग येथील अण्णा कावतील मंडळाच्या वतीने धार्मिक सण ,उत्सवाच्या निमित्ताने विविध
सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात. नुकताच या मंडळाने
शिवजयंती ही अनोख्या सामाजिक उपक्रमाने साजरी केली. यामध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून
इचलकरंजीमधील
रहिवाशी व भारतीय सैन्यामधून सेवानिवृत्त झालेल्या युवराज पोसुगडे ,
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सी.ए.झालेला यंत्रमाग कामगाराचा मुलगा पंकज खोत , शिवतीर्थास दररोज विनामोबदला फुलांचा हार देणारे दिलीप नेमिष्टे ,
आपतकालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावून येणारे तेजोनिधी रेस्न्यू फोर्सचे संतोष दत्तवाडे व सहकारी
आतापर्यंत ३५०० हून अधिक बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कार करणारे आधार रेस्न्यु फोर्सचे संभाजी झुटाळ ,
पंचगंगा नदी घाट स्वच्छता करणारे वरदविनायक जलतरण मंडळाचे विजय पलमारे ,विठ्ठल येसाटे ,
रस्सीखेच स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाकडून सुवर्ण पदक पटकावणारे श्रेयांस चौगुले अशा समाजासाठी आदर्श कार्य करणाऱ्या शिलेदारांचा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी डॉ. ठेेंगल यांनी
शिवजयंतीचे औचित्य साधत
अण्णा कावतील मंडळाने समाजातील सात रत्नांचा सत्कार करुन त्यांच्या कार्याचा गौरव
करत समाजासमोर चांगल्या कार्याचा आदर्श ठेवला असल्याचे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष संजय जगताप ,किरण लंगोटे ,
मोहन चौगुले, शितल चौगुले, संजय कुडाळकर, मयुर चिंदे, भाउसो मगदूम, रमेश चनविरे, अनिल मगदूम, डॉ प्रकाश पाटील, मोहन सौंदत्ते, अनिकेत पाटील, रणजीत जगताप, अजय जाधव, सुमीत मगदूम, ॠषिकेश काळभेरे, किशोर पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =