You are currently viewing परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू

कणकवली

मुंबई गोवा महामार्गावर नडगीवे येथील जिल्हा परिषद शाळेसमोर सकाळी 9:30 च्या दरम्यान स्वामी राणे आपल्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन खारेपाटणचा दिशेने परीक्षा देण्यासाठी जात असताना अपघात घडला यामध्ये अपघातात स्वामी विराट राणे (रा. तळेरे) हा मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला.

स्वामी विराट राणे हा आपल्या ताब्यातील मोटरसायलने खारेपाटणच्या दिशेने जात होता. नडगिवे शाळेसमोरील वळणावर असलेल्या सेफ्टी पोलला त्याच्या मोटसरसायकलची धडक बसून अपघात घडला. अपघातानंतर मोटरसायकल रोड डिव्हायडरवर जाऊन आदळली तर स्वामी हा सेफ्टी पोलला धडकल्यानंतर रस्त्यावरून घासत जाऊन नजीकच्या ओहोळात पडला यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाल्यामुळे यात स्वामी राणे याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली व वाहतूक पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =