You are currently viewing कुडाळ नगराध्यक्ष निवडीच्यावेळी झाला हायव्होल्टेज ड्रामा

कुडाळ नगराध्यक्ष निवडीच्यावेळी झाला हायव्होल्टेज ड्रामा

*शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते कोसळले*

 

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीच्यावेळी हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. कुडाळमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांना घेऊन कुडाळचे आमदार वैभव नाईक यांची गाडी नगरपंचायतीच्या समोर आली असता, भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी आमदार वैभव नाईक यांची गाडी आवारात घेण्यास प्रखर विरोध केला.

पोलीस व दंगल नियंत्रक पथक यांनी काही वेळात आमदार वैभव नाईक यांच्याशी बोलून गाडी आवारात न घेता रस्त्यावरच लावली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते देखील आक्रमक झाले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. यावेळी संजय पडते यांनाही धक्काबुक्की झाली. भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून “हात नाही लावायचा” असा जोरदार सूर ऐकू येत होता. एकंदरीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राडा संस्कृती दाखल झाल्याची जिल्हावासीयांना अनुभवायला मिळत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =