You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर स्पर्धा परीक्षा व्याख्यानोत्सव

अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर स्पर्धा परीक्षा व्याख्यानोत्सव

अर्जुन रावराणे विद्यालय, कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी येथे *तिमिरातुनी तेजाकडे* आयोजित शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम रात्रीच्या प्रकाशझोतात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिंदे सर यांनी केले.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पूजन करून करण्यात आले. मार्गदर्शक श्री रेडकर साहेब यांचे स्थानिक संस्था अध्यक्ष श्री जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शक श्री सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी सीमाशुल्क विभाग भारत सरकार )तसेच संस्थापक तिमिरातुनी तेजाकडे यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासकीय स्पर्धा परीक्षेसंदर्भात अनमोल असे मार्गदर्शन केले ते असे म्हणाले वैभववाडी तालुक्यात *शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव* अशी गावाची ओळख निर्माण होणे गरजेचे आहे. *जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय वेडे व्हा* असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला.


या कार्यक्रमाला स्थानिक संस्था अध्यक्ष श्री जयेंद्र रावराणे साहेब प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीनादकर बी. एस.श्री शिंगाडे सर,श्री चव्हाण सर, श्री नारकर सर तसेच प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती सावंत पी. पी. यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री नादकर सर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा