You are currently viewing उद्या 11 फेब्रुवारीला सैनिक पतसंस्था शाखेचे वेंगुर्ले येथील स्वमालकीच्या जागेत स्थलांतर..

उद्या 11 फेब्रुवारीला सैनिक पतसंस्था शाखेचे वेंगुर्ले येथील स्वमालकीच्या जागेत स्थलांतर..

वेंगुर्ला :

उद्या शुक्रवारी 11 फेब्रुवारीला सकाळी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्ग, वेंगुर्ला शाखा स्थलांतर सोहळा पाटील चेंबर्स, दाभोली नाका-वेंगुर्ले येथील स्वमालकीच्या जागेत स्थलांतरीत होत आहे.

सैनिक पतसंस्थेच्या वेंगुर्ले शाखेची स्थापना 16 डिसेंबर 2000 रोजी झाली आहे. अल्पावधितच वेंगुर्ले शहरवासियांचा चांगला प्रतिसाद मिळाला. संस्थेने दिलेल्या चांगल्या सेवेमुळे सर्वच बाबतीत पतसंस्था अग्रेसर राहिली आहे.

संस्था 200 कोटी ठेव गोळा करण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत असुन स्व-मालकीच्या सावंतवाडी, माणगांव, आंबोली, बांदा, कोलगांव तसेच वैभववाडी शाखेसाठी जागा नियोजित करण्यात आलेली आहे.

वेंगुर्ले इथं होणाऱ्या सैनिक पतसंस्थेच्या स्थलांतर सोहळ्यात उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन चेअरमन श्री शिवराम जोशी, व्हा. चेअरमन श्री हिंदवाळ केळुसकर, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. सुनिल राऊळ व संचालक मंडळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रधान कार्यालय भोगटे प्लाझा, गवळी तिठा, सावंतवाडी, फोन नंबर – 02363 272379, 275665 Reg. No. SGD/SDI/RSR/(CR)/ 102/91/Date 5.08.1991 येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा