You are currently viewing कणकवलीत मराठा समाजाच्यावतीने तहसिलदारांना निवेदन सादर…..

कणकवलीत मराठा समाजाच्यावतीने तहसिलदारांना निवेदन सादर…..

आरक्षण न मिळाल्यास आंदोलनाचा दिला इशारा

कणकवली :
मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्याबाबत १२ हजार सह्याचे निवेदन कणकवली तहसिलदार रमेश पवार यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी मराठा समाज नेते, मराठा समन्वयक एस.टी. सावंत, लवु वारंग, भाई परब, महेंद्र सांबरेकर, सखाराम सपकाळ, सुशील सावंत, अविनाश राणे, शेखर राणे,राकेश राणे, बाबू राऊळ, हरेश पाटील, स्वप्नील चिंदरकर, अमित सावंत, गजानन राणे, अमोल परब, दत्ता काटे, महेंद्र गावकर, नितेश नाटेकर, अनुप वारंग, संदीप राणे आदींसह मराठा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − ten =