You are currently viewing पश्चिम रेल्वे महिलांकरता २ विशेष ट्रेन….

पश्चिम रेल्वे महिलांकरता २ विशेष ट्रेन….

मुंबई वृत्तसार:

पश्चिम रेल्वे मार्गावर सोमवारपासून (२८ सप्टेंबर) पश्चिम रेल्वे मार्गावर ५०० ऐवजी ५०६ फेऱ्या धावणार आहेत.या लोकल फेऱ्यांपैकी २ महिला विशेष आहेत. वाढवी लोकल फेऱ्यांमुळे गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
पश्चिम रेल्वे (western railway) मार्गावर ५०० आणि मध्य रेल्वे (central railway) मार्गावर ४२३ लोकल फेऱ्या रविवार रात्रीपर्यंत सुरू होत्या.
लॉकडाऊन नंतर सध्या लोकलमधून फक्त केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, सर्व सरकारी आणि न बँक कर्मचारी यांना प्रवास करण्याची परवानगी आहे. मर्यादीत नागरिक प्रवास करत असले तरी गर्दीच्या वेळी लोकल फेऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याने . ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
कोरोनामुळे लॉकडऊन आधी रेल्वेच्या महिलांसाठी विशेष गाड्या होत्या. मात्र अनलॉकनंतर महिला विशेष गाड्या बंद करण्यात आल्या. मर्यादीत प्रवासी संख्येचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला असून.
सध्याच्या नव्या व्यवस्थेत १२ डब्यांच्या लोकलमध्ये महिलांसाठी द्वितीय श्रेणीचे ३ डबे राखीव असतात. या व्यतिरिक्त ३ प्रथम श्रेणी डब्यांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आसने राखीव असतात. एकूण महिला प्रवाशांची संख्या विचारात घेतल्यास ही व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर सोमवारपासून वाढवण्यात आलेल्या सहा लोकल फेऱ्यांपैकी २ महिला विशेष आहेत.
मनसेने लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करा नाही तर मुंबई आणि आसपासच्या सर्व शहरांतील पालिकांची बस वाहतूक तसेच राज्य परिवहनच्या एसटी यांच्या फेऱ्या वाढवून नागरिकांची सोय करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पश्चिम रेल्वेवर लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 10 =