You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालयात हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा

अर्जुन रावराणे विद्यालयात हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा

वैभववाडी

अर्जुन रावराणे विद्यालय व कै हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी येथे 8फेब्रुवारी 2022 रोजी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री जयेंद्र रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नादकर बी. एस.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी साबाजी रावराणे प्रमुख पाहुण्या सौ. प्राजक्ता पांडुरंग कोकरे सांस्कृतिक प्रमुख श्रीमती बोडेकर मॅडम श्री सारंग सर उपस्थित होते.


प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नादकर सर यांनी कार्यक्रमास विशेष उपस्थित दर्शवत कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती बोडेकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर श्रीमती सावंत मॅडम यांनी शाळेच्या ध्येय धोरणाबाबत विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुण्या श्रीमती कोकरे मॅडम यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ सुवासिनी रावराणे मॅडम यांनी आपल्या मनोगतात शाळांमधून असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे असे सांगितले व शुभेच्छा दिल्या. श्रीमती भोवड मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.


या कार्यक्रमाला प्रशालेच्या सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + two =