सिंधुदुर्गनगरी
राज्याच्या चौथे महिला धोरण दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध झाले आहे. या धोरणाच्या मसुद्याची मराठी भाषेतील प्रत दि. 7 फेब्रुवारी 2022 रोजी शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांच्या सुलभ संदर्भासाठी व अभिप्रायांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्याच्या सुधारीत महिला धोरणाच्या प्ररुप मसुद्याबाबतचे नागरिकांचे अभिप्राय मागविण्यात येत आहेत. नागरिकांनी त्यांचे अभिप्राय महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या mahilavikas2021@gmail.com या ई-मेलवर दि. 10 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावेत असे आवाहन राहुल मोरे, आयुक्त, महिला व बाल विकास यांनी केले आहे.