You are currently viewing चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरची रिक्षा आणि मोटारसायकलला धडक

चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरची रिक्षा आणि मोटारसायकलला धडक

कुडाळ वरून वेंगुर्ल्याला जात असताना अपघात

कुडाळ

चिरे वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा व मोटारसायकलला धडक देत झालेल्या अपघातात रिक्षा व मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदरचा हा अपघात गवळदेव मंदिराजवळील समोरील मार्गावर रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास घडला असुन सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. प्राथमिक तपासात डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत डंपर चालवित होता अशी माहिती मिळत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी 8:15 वाजण्याच्या सुमारास कुडाळ वरून वेंगुर्ल्याच्या दिशेने चिरे घेऊन जाणारा डंपर गवळदेव मंदिराजवळील चढावावरून वेगात जात असताना. गवळदेव मंदिरासमोरील हाॅटेल लक्ष्मी या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा व मोटर सायकलला जोरदार धडक दिली.
सुदैवाने रिक्षातील प्रवासी व रिक्षाचालक व मोटारसायकल स्वार हे त्यावेळी समोरील दुकानात असल्याने मोठी दुर्घटना टळली. सदरच्या या अपघातात मोठ्या प्रमाणात रिक्षा व मोटरसायकल चे नुकसान झाले असून घटनास्थळी कुडाळ पोलिस दाखल होत त्याने पंचानामा सुरु केला. मात्र या अपघाताची नोंद रात्री उशीरापर्यंत कुडाळ पोलिस ठाण्यात नव्हती.
सदरचा हा डंपर चालक मद्यप्राशन करून डंपर चालवित असल्यामुळे त्याचा डंपर वरील त्याचे नियंत्रण अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. सदर चा अपघात होताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 13 =