You are currently viewing संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला…

संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला…

कणकवली

शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांना स्थानिक न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दहा दिवसांच्या कालावधीत त्यांना पोलीस अटकेपासून संरक्षण असल्याची माहिती त्यांचे वकील ऍड. राजेंद्र रावराणे यांनी आज दिली.
श्री.रावराणे म्हणाले, श्री.सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केला होता. त्याच्या आत्ताच काही वेळापूर्वी सुनावणी झाली आणि न्यायालयाने संदेश सावंत यांना दहा दिवसाचा प्रोटेक्शन कालावधी दिलेला आहे. या दहा दिवसात त्यांनी ट्रायल कोर्टात जाऊन स्वतः हजर व्हायचं आणि जामिनासाठी अर्ज करायचा आहे. त्यांना १० दिवसाचे संरक्षण असल्याने पोलीस त्यांना अटक करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही ट्रायल कोर्टामध्ये स्वतः हजर व्हायचं आणि जामिनासाठी अर्ज करायचा आणि कायद्याच्या तरतुदीमध्ये असेल त्याप्रमाणे त्याला जामीन अर्जावर निर्णय घ्यायचा. जशी प्रक्रिया आमदार नितेश राणे यांच्या संदर्भात जागी तशीच प्रक्रिया गोट्या सावंत यांच्या संदर्भात आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात म्हणणे मांडताना, गोट्या सावंत यांचा हल्ला प्रकरणात सहभाग नाही. तसा काही पुरावा नाही. फक्त फिर्यादीने नाव घेतले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. या व्यतिरिक्त त्यांच्याविरुद्ध त्या गुन्ह्यात सहभागी झाल्याचा पुरावा आलेला नाहीये. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन द्यावा अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती असे ऍड.रावराणे म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा