You are currently viewing शब्दांजली

शब्दांजली

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना वाहिलेली शब्दसुमनांजली

ईश्वरा ही मोह पडला जणु सूर रंगी रंगण्याचा
कां ऋषींना ध्यास जडला स्वर समाधी शोधण्याचा
काळास ही वाटे विचारू कां प्राण रसिकांचा हिरावे
दृष्टीस तुझीया कां न आला अन्य पाचोळा जीवांचा

नव्हती लता तो ताल होता सूरासवे रंध्रात भिनला
ठाव हृदयांचा अलौकिक स्पंदनी विश्वात भ्रमला
आतां रितेपण या श्रुतीना आणि कोलाहल स्मृतींचा
शब्द थिजले भाव बुजले सरगम पहा अश्रूत भिजला

गीत गावे कां लिहावे प्रतिभाच बघ कोमेजली
आठवांचा डोह याची खोली कुणी कां मोजली
गीते तुझी घेतील जागा चांदण्यांची आतां नभी
प्रतिबिंब त्यांची अनुभवूही जागेपणी स्वप्नातली

दे जन्म मंगेशा पुन्हा तू मागे पुढे असशी पहा
श्रद्धांजली ना अर्घ्य हे तुज अर्पितो अरविंद हा

अरविंद
6/2/22

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 13 =