तेर्सबाबर्डे येथे विद्युत ट्रान्स्फर्मर मंजुर करावा यासाठीचे निवेदन देताना माजी सरपंच भास्कर परब,गणपत परब,अमोल पुरलकर,विजय परब,समीर परब, अभिजित परब,शिवलकर, हनुमंत चव्हाण,यांचेसह तेर्सेबाबर्डे ग्रामस्थ,
तेर्सेबाबर्डे येथील खरूडेवाडी,मरगळवाडी, आंबेरकरवाडी,कोरगावकर वाडी, वेंगुर्लेकरवाडी, येथील विज ग्राहकांना गेली अनेक वर्षे कमी दाबाचा विजपुरवठा होत आहे, महावितरण कंपनीचे जे पूर्वीचे ट्रान्स्फर्मर आहेत,त्यावर संपूर्ण गावातील विज वापराचा भार येतो त्यामुळे वरील वाडीतील विज ग्राहकांना कमी दाबाचा विजपुरवठा होतो,त्यामुळे संध्याकाळच्या वेळी सतत अंधुक प्रकाशात दैनंदिन कामे तसेच विद्यार्थ्यांना आपला अभ्यास करावा लागतो,या अंधुक प्रकाशामुळे विद्यार्थी तसेच गृहिणींना नाहक त्यास सहन करावा लागतो, यापूर्वी अनेक वेळा याबाबत पाठपुरावा केला होता,काहीवेळा याबाबत महावितरण ने सर्वेही केला होता, पण महावितरण कंपनीकडून या बाबत वेळकाढूपणा करण्यात आला याला आमचाच पाठपुरावा कमी पडला म्हणून हा विषय आजपर्यंत रखडला होता, त्यासाठी आज पून्हा याबाबत पाठपुरावा करण्यासाठी महावितरण कंपनीचे उप अभियंता श्री,कांबळे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले, यावेळी कांबळे साहेब यांनी दोन दिवसांत मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल,व सदरचा प्रस्ताव लवकरच मार्गी लावून लवकरच याठिकाणी ट्रान्स्फर्मर बसविण्यात येईल अशी ग्वाही उप अभियंता श्री कांबळे यांनी दिली, असल्याचे माजी सरपंच भास्कर परब यांनी सांगितले,यावेळी गणपत परब अमोल पुरलकर विजय परब समीर परब अभिजित परब शिवलकर हनुमंत चव्हाण व इतर ग्रामस्थ उपस्थित होते,