You are currently viewing पोलिसांविरुद्ध न्यायालयीन कारवाई करणार.

पोलिसांविरुद्ध न्यायालयीन कारवाई करणार.

पोलिसांच्या भूमिकेवर वकील संग्राम देसाई यांची टीका

कणकवली

पोलीस आणि सरकारची आतापर्यंत या कसे मध्ये काम करण्याची पद्धत पाहिली असता, आमदार नितेश राणे ,राणे कुटुंब आणि भाजप चे कार्यकर्ते यांना कोणत्या ना कोणत्या तरी खोट्या केसेसमध्ये गोवण्याचा प्रयत्न चाललेला आहे.काल जिल्हा न्यायालया समोर पोलिसांनी आम.नितेश राणे यांची गाडी अडवून,त्यांना कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची होती.
आजही नियमित जामिनासाठी आमदार राणे जेवढेदिवस बाहेर राहतील तेव्हडे दिवस कार्यकर्त्यांना त्रास दिला जाईल याचा विचार करून आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा मन राखून आमदार नितेश राणे न्यायालयात शरण गेले आहेत.मात्र काल न्यायालया बाहेर पोलिसांनी अडवून जो प्रकार केला त्या बद्दल पोलिसांविरुद्ध न्यायालयीन कारवाई करणार अशी माहिती राणेंचे वकील संग्राम देसाई, वकील उमेश सावंत, वकील राजेंद्र रावराणे,वकील राजेश परुळेकर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
ओरोस येथे न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आम.नितेश राणे यांची गाडी अडवून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला.माझी खासदार निलेश राणे पोलिसांना विनवणी करत असताना सुद्धा ते ऐकून घेत नव्हते हा प्रकार म्हणजे कार्यकर्त्यांना राग यावा असे कृत्य पोलीस करत होते.कार्यकर्त्यांकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी अशी आजही पोलिसांची कार्यपद्धती आहे अशी टीका वकील संग्राम देसाई यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा