You are currently viewing संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला

संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला

आमदार नितेश राणे यांना जबर धक्का

कणकवली येथील सतीश सावंत समर्थक संतोष परब यांच्यावर भर रस्त्यात झालेल्या हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे व त्यांचे सहकारी आदींवर गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालय, हायकोर्ट आदी ठिकाणी प्रयत्न करूनही जामीन मिळाला नव्हता. सुप्रीम कोर्टात गेल्यानंतरही राणेंना अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही, उलट जिल्हा न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज करण्याचे सूचित करत, 10 दिवसात जिल्हा न्यायालयात शरण येण्यास सांगितले होते.
सोमवार दिनांक 31 जानेवारी रोजी नितेश राणेंच्या जामीनाबाबत जिल्हा न्यायालयात दोन्ही पक्षांनी बाजू मांडली होती आणि मंगळवारी निकाल देण्यात येणार होता. आज जिल्हा न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा जमीन अर्ज फेटाळला असून आम.नितेश राणेंच्या वकिलांनी हा निर्णय अपेक्षितच होता अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
जिल्हा न्यायालयातून बाहेर पडत असताना नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडविली होती. का अडवली याबाबत माहिती मिळू शकली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा