You are currently viewing “कवितेवर बोलू काही”….

“कवितेवर बोलू काही”….

साकव्य जागतिक व्हाट्सअप्प समुहाच्या वर्धापनानिमित्त विशेष चर्चासत्र

साकव्य जागतिक व्हाट्सअप्प समुहाच्या वर्धापनानिमित्त विविध ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यापैकी दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी “कवितेवर बोलू काही” हा विशेष चर्चासत्राचा ऑनलाईन कार्यक्रम उत्साहात सम्पन्न झाला. कविता म्हणजे काय त्यातील वृत्त, छंद या विषयी अतिशय सखोल आणि तंत्रशुद्ध असे मार्गदर्शन समूहाचे प्रमुख श्री पांडुरंगजी कुलकर्णी यांनी केले. त्यांनतर प्रा.राज शेळके यांनी कविता कशी सुचते आणि त्यातील लय, ताल विचारात घेऊन कवितेची मांडणी कशी करावी या विषयीची अभ्यासपूर्ण माहिती दिली.

काव्यनिर्मितीची प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक असलेली प्रतिभा, कवितेतील भाव या विषयावर अतिशय सखोल विवेचन अलकाताई कुलकर्णी यांनी केले आणि डॉ. चिदानंद फाळके यांनी शब्द त्यांचे अर्थ, शब्दसंपत्ती त्यांची गुंफण हे बहिणाबाई यांचं उदाहरणं देऊन छान पटवून दिले. चर्चासत्रातील अभ्यासपूर्ण माहितीचा उपयोग सर्व नवोदित कवींनी करून घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले तर सदर कार्यक्रमात श्रोत्यांपैकी कोलकत्याहून श्री अनिल देशपांडे यांनी प्रश्न विचारले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 19 =