You are currently viewing सावंतवाडीकरांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार टी. एन. नाईक यांना श्रद्धांजली…

सावंतवाडीकरांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार टी. एन. नाईक यांना श्रद्धांजली…

सावंतवाडी

ज्येष्ठ पत्रकार तुकाराम उर्फ टी. एन. नाईक यांना येथील राजकीय पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने आज श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. तर अनेकांनी त्यांच्या आठवणींना आपल्या भाषणातून उजाळा दिला.

यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, विकास सावंत, प्रविण भोसले, पुंडलिक दळवी, बाबु कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, प्रविण मांजरेकर, डॉ. दिनेश नागवेकर, अनारोजीन लोबो, दिपाली सावंत, भारती मोरे, सुरेश भोगटे, तानाजी वाडकर, दत्ता सावंत, विशाल सावंत, शैलेश गवंडळकर, हिदायतुल्ला खान, श्री. शृंगारे, श्री.पाटिल, प्रतिक बांदेकर, संजय पेडणेकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना श्री.केसरकर म्हणाले, कै. नाईक यांच्या रूपाने सावंतवाडीकरांनी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व गमावलं आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तर त्यांचा मुळात शिक्षकी पेशा असला, तरी पत्रकार साहित्यिक ते नगरसेवक अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपले योगदान दिले आहे. नगरसेवक असताना सावंतवाडीच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे, अनेक राजकीय मंडळींना त्यांनी यशाचे सल्ले दिले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 1 =