You are currently viewing केंद्रीय मंत्री राणेंची देवगड भाजपा नगरसेवकांनी घेतली सदिच्छा भेट…!

केंद्रीय मंत्री राणेंची देवगड भाजपा नगरसेवकांनी घेतली सदिच्छा भेट…!

कणकवली

देवगड नगरपंचायतीवर निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आठ नगरसेवकांनी भाजपा नेते, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेऊन शुभाशीर्वाद घेतले. या भेटी दरम्यान केंद्रीयमंत्री राणे, भाजपा आमदार नितेश राणे, नीलमताई राणे यांनी नवनियुक्त नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या.

कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी जाऊन भाजपाचे नगरसेवक शरद ठुकरुल,प्रणाली माने,तन्वी चांदोस्कर, अरुणा पाटकर,आदया गुमास्ते, मनीषा जामसंडेकर,रुचाली पाटकर,स्वरा कावले यांनी भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत,पक्ष निरीक्षक समीर नलावडे, भाजपा देवगड तालुका मंडळ अध्यक्ष संतोष किंजवडेकर,भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप साटम,देवगड शहर अध्यक्ष योगेश पाटकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कनेरकर, देवगड शहर अध्यक्ष योगेश पाटकर, राजा भुजबळ,आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − four =