कुडाळ :
आज वन परिक्षेत्र कुडाळ येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस उत्साहात पार पडला.
या शुभदिनाचे औचित्य साधत “वनक्षेत्रातील दुर्मिळ वनस्पतींची ओळख व संवर्धन” या विषयावर कुडाळ वनपरिक्षेत्रामार्फत क्षेत्रीय कर्मचारी यांचेकरिता आयोजित कार्यशाळेत श्री. मिलिंद पाटील एम एस्सी (फॉरेस्ट्री) तथा बांबू, दुर्मिळ वनस्पती अभ्यासक यांनी पश्चिम घाटातील दुर्मिळ होत चाललेल्या स्थानिक वनस्पतींबाबत माहिती दिली तसेच त्यांच्या पिंगुळी येथील रोपवाटिके मध्ये क्षेत्रीय भेटी दरम्यान विविध दुर्मिळ वृक्ष प्रजातींची ओळख करून देण्यात आली.
दुर्मिळ व संकटग्रस्त स्थानिक वनस्पतींच्या संवर्धनाबाबत लोकचळवळ होणे काळाची गरज झालेली आहे. या मध्ये सर्वांनी आपलं योगदान देणं महत्वाचं आहे.
सदर कार्यशाळेस वनपरिक्षेत्र कुडाळ व सामाजिक वनीकरण कुडाळ चे अधिकारी व कर्मचारी तसेच डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे विद्यार्थीही उपस्थित होते.
सदर कार्यशाळा उपवनसंरक्षक (प्रा.) सावंतवाडी श्री. शहाजी नारनवर व सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) सावंतवाडी श्री. आय. डी. जालगावकर यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली असलेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री. अमृत शिंदे यांनी दिली.