You are currently viewing भुताखेतांच्या गोष्टी

भुताखेतांच्या गोष्टी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

 

*भुताखेतांच्या गोष्टी*

➖➖➖➖➖➖➖➖

( क्रमांक १२ वा )

मागील कथेतील तात्या ( ज्यांना कर्णपिशाच्च्य विद्या अवगत होती ते ) हे गावचेच रहिवासी असल्यामुळे ,नेहमी भेटत असत .

एक दिवस त्यांची अन माझी एस. टी. स्टैंड वर सकाळी गांठ पडली . आम्ही दोघेही एकाच एसटी बस मध्ये एकाच दोन सिटच्या बेंच वर बसलो ..मी सहाजिकच त्यांचे तिकीट काढू लागलो पण त्यांनी काढून दिले नाही . गाड़ी निघाली ..इतर चर्च्या सुरु झाली , मला म्हणाले तूं आज बसने कसा चालला आहेस ? मी म्हणालो ” आज घरचे लोक कुलदेवतेला गेलेत गाडी घेवून ..जेजुरी , मोरगांव गणपती , पंढरपुर , तुळजापुर , अक्कलकोट , गाणगापूर इकडे जावुन येणार आहेत ..आजच सकाळी लौकर गेले आहेत ..त्यांनी त्यांचा पानाचा डबा काढला , सुपारी कातरुन ,चुना लावून सवयी प्रमाणे तोंडात पान टाकले ..मला म्हणाले , अक्कलकोट गाणगापूर ला जाणे होणार नाही .. मला आश्चर्य वाटले ..पण ..मी काही बोललो नाही . मी म्हटले ! म्हटले असतील ..तिकडे ज्यास्त लक्ष दिले नाही .

प्रवास सुरु होता ..आम्ही ड्रायव्हर सिटच्या मागे दुसऱ्या बेंच वर बसलो होतो .त्यांना वारे सहन होत नाही म्हणून मी खिड़की जवळ बसलो होतो . तात्यांना विचारले आज कसे काय पुण्याला निघालात , ते म्हटले पुतण्याच्या मुलीचा ( नातीचा) आज साखरपुडा आहे .कुटुंबातील सर्व कालच गेलेत . नंतर काही वेळाने आमच्या गप्पा आपोआप थांबल्याही ..पण गाडीत देखील तात्या डोळे मिटुन स्वतःच्या तन्द्रित होते ..मनात कुणाशी तरी बोलत होते ..( हे नेहमीचे असल्यामुळे मला हे सर्व माहिती होते ) पण त्या बोलण्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या एकंदरीत हालचालीवरुन जाणवत होते ..इतर प्रवाशांना त्यांची तशी काहीच माहिती नव्हती ..ड्रायव्हरसीटच्या मागील आडव्या सीटवर काही तरुण मुले बसली होती ,( कॉलेजीअन्स) असावित ..मुलेच ती ! त्यांचे लक्ष तात्यांचेकड़े होते ..एकंदरीत तात्यांच्या हावभावामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहुन, मुलांना ते सारे विलक्षण वाटले .. ती मुले एकमेकांना खुणावत तात्यांच्या कड़े पाहुन हासु लागली , आपापसात त्यांची टिंगल करु लागली ..तात्यांचा आज धोतर ,शर्ट , कोट टोपी असा पेहराव होता .. काहीवेळाने त्यांना कळून चुकले की समोरची मुले आपली टिंगल करत आहेत .. तेंव्हा त्यांनी त्या मुलांना सांगीतले की अशी टिंगल करु नका ..गप्प बसा ..पण मुलांना तर आणखी चेव चढला ..मीही मुलांना सांगीतले , पण त्यांचे माकड़चाळे थांबले नाहीत …सर्व एसटी मध्ये त्या मुलांचा धुडगुस ऐकू येत होता . शेवटी तात्यांनी मुलाना सांगीतले , की आता तुम्ही जर थांबला नाहीत तर मी तुमची गंमत करेन ..तरीही मुले दंगा करीत राहिली ..तात्यांनी कोटाच्या खिशांतुन एक लिंबू काढले आणी आपल्या हातांच्या दोनही तळहातांच्या मध्ये हळू हळू फिरवत राहिले …( मी शेजारीच बसलो होतो ,आणी ते पहातही होतो ..) काय आश्चर्य त्या चारही मुलांच्या अंगाला प्रचंड खाज सुटली होती ..इतकी की ती मुले उभे राहून अंग खाजवित होती . त्यां मुलांना शेवटी असह्य झाले होते .ती बेचैन झाली ..रडकुंडिला आली. शेवटी तात्या म्हणाले गंमत बासका . मुलांना चूक कळून चुकली …. तात्यांनी ते लिंबू खिशात ठेवले .मुलांचा त्रास कमी झाला ..पुणे आले प्रवास संपला होता ..

मी माझी कामे उरकुन रात्री मुक्कामाला घरी परतलो …

दूसरे दिवशी मी माझ्या उद्योगाला गेलो . रात्र झाली तेंव्हा घरी मला

फ़ोन आला .आम्ही तुळजापुरला आलो आहोत , पण गाडिचा डीज़ल पाईप फुटला आहे , उद्या सोलापुरात तो टाटा शोरूम मध्ये बदलावा लागेल नंतर मग आम्ही पुढे अक्कलकोट ,गाणगापूरला जायचे की नाही ते ठरवितो ..मी ठीक आहे म्हटले ..तेंव्हा मला तात्यांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली ..ते मला म्हटले होते ..अक्कलकोट गाणगापूरला जाणे होणार नाही . तसेच झाले दुपारपर्यंत गाडीचे काम झाले नव्हते …सर्व कंटाळून पुढे न जाता घरी परतले …हीही सत्य घटना मी अनुभवलेली .. कर्णपिशाच्य विद्या अवगत असेल तर पिशाच्च्ययोनी वश असते . त्यामुळेच अशा घटना घडू शकतात ..याची जाणीव होते .

(संक्षिप्त)

➖➖➖➖➖➖➖➖

*©विगसा*

८ – ६ – २०१८ .

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − nine =