कणकवली
प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत हरकुळ बुद्रुक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी
हरकूळ बुद्रुक गावातील गुणवंत विद्यार्थी जय संतोष भाट या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. कु. जय संतोष भाट हा हरकुळ बुद्रुक गावचा सुपुत्र असुन, तो सध्या कणकवली महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. देशातील 60 बालसंशोधकामध्ये महाराष्ट्र राज्यातील चार बाल संशोधनाची निवड झाली. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हातील एकमेव हरकूळ बुद्रुक गावातील बालसंशोधकाची निवड झालेली आहे.
7 सप्टेंबर 2021 मध्ये इन्स्पायरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात 60 टाॅप माॅडेलची निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील चार विद्यार्थी माॅडेल्सची उत्कृष्ट माॅडेल्स म्हणून निवड करण्यात आली. त्यामध्ये हरकूळ बुद्रुक गावाच्या गुणवंत विद्यार्थीच्या निवड झाली.
अशा विद्यार्थीच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय समोर झेंडा फडकविण्यात आला. गेली तीन वर्ष 26 जानेवारी रोजी गावातील जेष्ठ,कर्तृत्ववान.गुणवंत विद्यार्थी, नागरिकांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात येतो. त्यांना हा मान दिला जातो.
तसेच रत्नागिरी येथे महिला पोलीस म्हणून निवड झालेल्या संपदा ठाकुर यांचा ही सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी सरपंच गौसिया बुलंद पटेल, माजी उपसभापती बुलंद राजअहमद पटेल, ग्रामपंचायत सदस्य राजू पेडणेकर, आसिफ पटेल ग्रामपंचायत सदस्य, संजय सुर्यकांत कवटकर ग्रामविकास अधिकारी, संतोष तांबे पोलीस पाटील, रमाकांत तेली ल.गो.सामंत विद्यालय चेअरमन,ओमप्रकाश ताम्हाणेकर माजी चेअरमन ल.गो.सामंत विद्यालय, आरोग्य कर्मचारी, कृषी सहाय्यक, प्राथमिक शाळा हरकुळ बुद्रुक शिक्षक- विद्यार्थी, पोस्ट ऑफिस कर्मचारी, आशा सेविका , अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी , कोतवाल तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.