You are currently viewing डिजिटल सभासद नोंदणी अभियानाचा जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते शुभारंभ

डिजिटल सभासद नोंदणी अभियानाचा जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते शुभारंभ

सिंधुदुर्गात काँग्रेस पक्षाच्या बळकट 

सावंतवाडी

सिंधुदुर्गात काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी डिजिटल सभासद नोंदणी अभियानाचा जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आले आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार हा अभियान आजपासून सावंतवाडी येथे सुरू करण्यात आले आहे.

राष्ट्रीय कॉंग्रेसशी सभासद नोंदणी कार्यक्रम पूर्वी नोंदणी पुस्तकाद्वारे केला जात होत. मात्र आता नवीन धोरणानुसार ती नोंदणी आता डिजिटल पद्धतीने करण्यात येणार आहे या नोंदणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात मुख्य नोंदणीकरता नेमण्याचे आदेश असून जिल्हामुख्य नोंदणीकरता व ट्रेनर म्हणून श्री समीर वंजारी सावंतवाडी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच आठही तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद, मतदारसंघ निहाय व शहरासाठी मुख्य नोंदणी करते नेमण्याचे होते त्यानुसार सर्व तालुकाध्यक्षांनी मुख्य नोंदणी करते नेमून ते जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला पाठवून मंजुरी घेतली आहे. सदर मुख्य नोंदणी करते हे जिल्हा परिषद व शहर बूथनिहाय प्रत्येक केंद्रावर दोन असे ६ फेब्रुवारीपूर्वी नेमण्यात येणार आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा