केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजीनामा न दिल्यास आरपीआय कार्यकर्ते करणार निदर्शने

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजीनामा न दिल्यास आरपीआय कार्यकर्ते करणार निदर्शने

जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांचा इशारा..

ओरोस :

भाजपा सोबत असलेली युती तोडा आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्या. अन्यथा सिंधुदुर्गातील पदाधिकारी व कार्यकर्ते राजीनामा देतील असा इशारा आरपीआय पक्षाचे (आठवले गट) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांनी दिला आहे.

 

आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्त्यांची भूमिका आहे. भाजप सोबत युती तोडून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आहे. भाजप पक्षासोबत आम्ही कधी काम करू शकत नाही. भाजपाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा व चळवळीच्या विरोधात, भारतीय घटना संविधानाच्या विरोधात नेहमी काम केल्याचा आरोप रतन भाऊ कदम यांनी केला आहे. रामदास आठवले हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आंबेडकर चळवळीचे नेते आहेत. त्यामुळे जिथे विचार जुळत नाही. त्यापक्षाशी युती तोडावी अशी आंबेडकरी जनतेची भावना आहे. रामदास आठवले यांनी युती तोडून मंत्रिपदाचा राजीनामा न दिल्यास निदर्शने करण्यात येतील अशा इशारा रतन भाऊ कदम यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा