You are currently viewing राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा 28 ते 30 जानेवारी दरम्यान पनवेलमध्ये महाअंतिम फेरी

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा 28 ते 30 जानेवारी दरम्यान पनवेलमध्ये महाअंतिम फेरी

मुंबई :

 

राज्यस्तरीय हॉटेल करंडक एकांकिका स्पर्धा 28 ते 30 जानेवारी दरम्यान पनवेल मध्ये महाअंतिम फेरी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय स्वायत्त यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 8 व्या राज्यस्तरीय हॉटेल करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी 28 ते 30 जानेवारी या कालावधीत पनवेलमध्ये होणार आहे. या स्पर्धेकरिता सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची उपस्थिती लाभणार असून स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने आहेत, अशी माहिती श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी बुधवारी दिनांक 19 खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांक 1 लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच मराठी रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा यावर्षीपासून जीवन गौरव स्वरूपात गौरव रंगभूमीचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यंदा या पुरस्काराचे मानकरी ठरले ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश बुद्धीसागर पन्नास हजार रुपये रोख सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे, अशी माहिती परेश ठाकूर यांनी यावेळी दिली. सीकेटी महाविद्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत अभिनेते ओमकार भोजने यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

28 ते 30 जानेवारी दरम्यान होणाऱ्या एकांकिकांचा लाभ सर्व नाट्यप्रेमी नाट्य रसिकांनी घ्यावा, ही विनंती संस्थेमार्फत करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा