You are currently viewing वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात तब्बल सात वर्षांनी प्रसुती विभाग सुरू…

वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात तब्बल सात वर्षांनी प्रसुती विभाग सुरू…

वेंगुर्ले

ग्रामीण रुग्णालय व आत्ताचे उपजिल्हा रुग्णालयात तब्बल सात वर्षांनी प्रसुती विभाग सुरू झाला आहे. या विभागाच्या डाॅ.स्वप्नाली माने-पवार यांचे भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्लेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
पुर्वाश्रमीचे वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय व आत्ताचे उपजिल्हा रुग्णालयात गेली कित्येक वर्षे महिला प्रसुती तज्ञ नसल्याने प्रसुती विभागच बंद स्थितीत होता. परंतु दोन महिन्यापूर्वी महिला डाॅक्टर स्वप्नाली माने – पवार यांची शासनाने उस्मानाबाद येथुन बदली करून वेंगुर्ले येथे नेमणूक केल्यामुळे गरोदर महीलांची तपासणी सुरू झाली व तब्बल सात वर्षांनी वेंगुर्लेत प्रसुती विभाग सुरू झाला व त्यामुळे गोर गरीब महीलांची अडचण दुर झाली आहे.
डाॅ . माने-पवार नुकतीच एका गरोदर महिलेची नाॅर्मल प्रसुती केली व वेंगुर्ले रुग्णालयातील प्रसुती विभाग पुन्हा एकदा सुरू केला. त्याबद्दल त्यांचे भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर, उपनगराध्यक्षा कु. शितल आंगचेकर, माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे, नगरसेविका श्रेया मयेकर, नगरसेविका कृपा मोंडकर, रसीका मठकर इत्यादी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 − 4 =